रशियाच्या दक्षिणेकडील येइस्क शहरात सोमवारी लष्करी विमान कोसळले. हे विमान एका निवासी इमारतीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्थेने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियन युद्ध विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर अझोव्ह समुद्रावरील येस्क बंदरातील एका निवासी भागात विमान कोसळले. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, एसयू-34 च्या एका इंजिनला टेक ऑफ दरम्यान आग लागली. त्यानंतर विमान खाली पडले. ते ट्रेनिंग फ्लाइटवर होते.
दोन्ही क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. मात्र, विमान एका निवासी भागात कोसळले. आपत्कालीन व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, आपत्कालीन सेवा कर्मचारी आग विझवण्यात गुंतले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, अपघातानंतर लागलेली आग सुमारे 2000 चौरस मीटर परिसरात पसरली होती. या दुर्घटनेमुळे येथील 15 हून अधिक अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. जीवितहानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत फक्त दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी अधिकारी बाधित लोकांची नेमकी आकडेवारी गोळा करत आहेत. ज्या इमारतीत विमान कोसळले त्या इमारतीतील 21 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे आजूबाजूच्या 15 इमारतींना आग लागली होती, त्यामुळे तेथे राहणाऱ्या सुमारे 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना या घटनेची माहिती देण्यात आल्याचे क्रेमलिनच्या वतीने सांगण्यात आले आहे. आरोग्यमंत्री आणि स्थानिक राज्यपाल घटनास्थळी उपस्थित आहेत. येस्क शहरात सुमारे 90 हजार लोक राहतात. हे रशियामधील सर्वात मोठ्या एअरबेसपैकी एक आहे.