सोमवारी युक्रेनच्या ड्रोन विमानांनी रशियाच्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दोन हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात पुतिन यांचे तीन सैनिक ठार झाले तर चार जखमी झाले. या ड्रोन हल्ल्यात दोन रशियन Tu-95 अणुबॉम्बरही नष्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे. युक्रेन आणि ब्रिटनला घाबरवण्यासाठी रशियाने हे बॉम्बर तैनात केले होते. त्याच वेळी, युक्रेनकडून आणखी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, रशियन एअरबेसला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याआधी, सेराटोव्हमधील एंगेल्स एअरबेस आणि रियाझानमधील डायघिलेव्ह एअरबेसवर मोठे स्फोट झाल्याची नोंद झाली होती, परंतु अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
रशियन सैन्याने युक्रेनियन हल्ल्यांवर अधिकृतपणे भाष्य केले नसले तरी, त्यांच्या हवाई दलाने "काय झाले?" असे ट्विट केले. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाही आक्रमक झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा रशियन सैन्याने ओदेसा, चेरकासी आणि क्रिवी रिह शहरांसह देशातील अनेक भागांवर बॉम्बफेक केल्याचे सांगितले जात आहे.