Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

रशियात प्रवासी विमान कोसळले, 71 ठार

international news
मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्को शहराच्या बाहेर विमानाला अपघात झाला असून यात ७१ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
 
सारातोव एअरलाइन्सचे 'अँतोनोव एन-१४८' हे विमान दोमोदेदोवो विमानतळावरून ओर्स्कला जात होते. मॉस्को शहराच्या बाहेर हे विमान कोसळले, असे सांगण्यात येत आहे. या विमानात ६५ प्रवाशी होते तसेच पायलटसह अन्य ६ सदस्य होते, असे सूत्रांकडून सांगण्यात येते. दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अंश सापडले असून त्या ठिकाणी आपत्कालीन मंत्रालयाने एक पथक पाठवले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 
 
अरुगुनोवा गावाजवळ आकाशातून जळालेले विमान पडताना पाहिल्याचा दावा काही गावकऱ्यांनी केला. दरम्यान, विमानाला अपघात कशामुळे झाला याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खराब हवामान किंवा पायलटची चूक हे दोन कारण अपघाताची होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करून तपास सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला बाळाला जन्म