'सेल्फीवाले माकडाला' इंडोनेशियातील पशू हक्कांसाठी काम करणाऱ्या एका समूहाने चक्क 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून नामांकीत केले आहे 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा) ही संस्था पशू हक्कांसाठी काम करते.
या संस्थेनेच या माकडाच्या सेल्फीच्या हक्काबाबत आवाज उठवला होता. पेटाने या माकडाबद्दल म्हटले आहे की, हा माकड एक जीव आहे. वस्तू नव्हे. त्यामुळे याने काढलेल्या सेल्फीवर इतर कोणाचा हक्क नसून, त्या माकडाचाच आहे.
या माकडाने 2011 मध्ये एका बेटावर ब्रिटीश नेचर फोटोग्राफर डेव्हिड स्लेटरचा कॅमेरा हाताळत असताना चुकून क्लिक पडला आणि चक्क माकडाचा सेल्फी निघाला. तेव्हापासून माकडाच्या सेल्फीवरून मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला होता.