पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पनामा पेपर्स लिक प्रकरणात अडकल्यानंतर पंतप्रधानपदावरुन हटविण्यात आले. आता त्यानंतर त्यांच्याजागी शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांच्या नावावर पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) च्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे.
पंतप्रधानपदावरुन नवाज शरीफ यांना हटविण्यात आल्यानंतर पाकिस्तानचे नवे पतंप्रधान कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता शाहबाज शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नवाज शरीफ यांचे शाहबाज शरीफ हे धाकटे बंधू आहेत. पाकिस्तान मीडियाच्या वृत्तानुसार, पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज हे नवे पंतप्रधान असतील.
नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानपदावर असताना परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. नवाज शरीफ यांना पनामा पेपर लीकप्रकरणी दोषी ठरवत पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे. नवाज शरीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.