Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

व्हर्जिनियातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबार, अनेकांच्या मृत्यूची भीती

Shooting at Walmart store in Virginia America International News in Marathi
, बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (13:26 IST)
अमेरिकेत पुन्हा एकदा सामूहिक गोळीबाराची घटना घडली आहे. व्हर्जिनियातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्हर्जिनिया वॉलमार्टमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारात अनेक जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.या गोळीबारांत हल्लेखोर देखील मारला गेल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
हा गोळीबार स्टोअरच्या व्यवस्थापकाने केल्याचा दावाही अनेक वृत्तांत केला जात आहे. त्याने आधी कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
 
याआधी फिलाडेल्फियाच्या केन्सिंग्टन आणि अॅलेघेनी भागातील एका बारमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यादरम्यान 12 जण गंभीर जखमी झाले. गेल्या महिन्यात 13 ऑक्टोबरला दक्षिण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातून अशीच बातमी समोर आली होती. येथील एका रहिवासी भागात गोळीबार झाला, ज्यामध्ये कर्तव्यावर नसलेल्या पोलिसासह पाच जण ठार झाले. याआधी फ्लोरिडाच्या टँपा शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते.

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA World Cup: लिओनेल मेस्सीने मोडला डिएगो मॅराडोनाचा विक्रम