Publish Date: Wed, 04 Jun 2025 (12:14 IST)
Updated Date: Wed, 04 Jun 2025 (12:17 IST)
कॅनडाच्या टोरंटो शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कॅनडाच्या टोरंटोमध्ये झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. तसेच नॉर्थ यॉर्कमधील लॉरेन्स हाइट्स परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. टोरंटो पोलिसांनी पुष्टी केली आहे की किमान पाच जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिस हल्ल्याचा तपास करत आहे."
Edited By- Dhanashri Naik