आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन स्पेसएक्स कॅप्सूल पृथ्वीवर रवाना झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता पृथ्वीवर परततील.
सुनीत विल्यम्स आणि इतर तीन अंतराळवीरांना आज सकाळी आयएसएसमधून अनडॉक केले. अंतराळवीरांचा हा प्रवास 17 तासांचा असणार आहे. ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरतील
गेल्या वर्षी 5 जून 2025 रोजी नासाच्या मोहिमेचा भाग म्हणून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी बोईंग अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केले. त्यांना तिथे फक्त एक आठवडा थांबायचे होते पण अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते दोघेही पृथ्वीवर परतू शकले नाहीत. त्या दोघांसाठी, 10 दिवसांचे मिशन 9 महिन्यांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेत बदलले.