Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेंट पीटर्सबर्ग मेट्रोत मोठा स्फोट, 10 लोकांचा मृत्यू

सेंट पीटर्सबर्ग मेट्रोत मोठा स्फोट, 10 लोकांचा मृत्यू
रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील दोन मेट्रो स्थानकांमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. सेंट पीटर्सबर्ग शहरातील सनाया स्क्वेअर या भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये हा स्फोट झाला आहे. रशियाचे राष्ट्पती ब्लादिमीर पुतीन शहरात असून, त्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटांचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्रपती यांनी या स्फोटांमागील दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारलेली नाही.
 
स्फोटानंतर सोशल मीडियावर काही छायाचित्रे प्रसारित झाली असून, त्यात एका मेट्रोच्या डब्याचा दरवाजा स्फोटाने उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे.  दरम्यान, या स्फोटांनंतर मेट्रो स्टेशनमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, स्फोटांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. दरम्यान या स्फोटात 10 जण मृत्युमुखी तर 50 जण जखमी झाल्याची माहिती रशियाच्या गव्हर्नरांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 
 
सेंट पीटर्सबर्ग मेट्रोने या स्पोटांबाबत प्रसिद्ध केलेल्या आपल्या पत्रकात ट्रेनमध्ये कुठल्या तरी अज्ञात वस्तूद्वारे स्फोट घडवून आणण्यात आल्याचे सांगितले. रशियातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी या स्फोटांबाबत दिलेल्या वृत्तात ट्रेनमध्ये  स्पोटके लावून स्फोट घडवून आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयपीएलमधील पाच विस्फोटक फलंदाज