Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोपटाने दिली साक्ष

पोपटाने दिली साक्ष
अमेरिकेत एका खून खटल्यात अनोख्या साक्षीदाराने दिलेल्या साक्षीमुळे खुनाबाबतचे गूढ अलगद उलगडले. फ्रिकन ग्रे प्रजातीच्या पोपटाने दिलेल्या साक्षीच्या आधारावर कोर्टाने पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला दोषी ठरवले.
 
अमेरिकेतील मिशिगन येथील सँड लेक परिसरात ग्लेन्ना दुरम या महिलेने 2015 मध्ये घरातील पाळीव पोपयासमोरच आपल्या पती मार्टिनला गोळ्या घाल्या होत्या. ग्लेन्नाने मार्टिनवर पाच गोळ्या झाडून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बचावली. या घटनेचा एकमेव साक्षीदार घरातील त्यांचा पाळीव पोपट होता.
 
या खून खटल्याची सुनावणी न्यायलयात सुरू होती. प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने खर्‍या आरोपीला दोषी ठरवण्याचे न्यायलयासमोर मोठे आव्हान होते. यातच मार्टिनची पहिली पत्नी क्रिस्टिना केलर हिने पोपटाच्या आवाजाचा व्हि‍डिओ न्यायलयासमोर सादर केला.
 
क्रिस्टिनाने ज्युरींना सांगितले की, ज्यावेळी आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आमचा पाळीव पोपट गोळी चालवू नकोस असे वारंवार म्हणत होता. पोपटाच्या या साक्षीच्या आधारावर ज्युरींनी मार्टिनची दुसरी पत्नी दुरम हिला दोषी असल्याचे घोषित केले. आता तिला पुढील महिन्यात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओकडून 24 आणि 54 रुपयाचे प्लॅन लाँच