Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीरियात रासायनिक हल्ला, १०० ठार

सीरियात रासायनिक हल्ला, १०० ठार
, बुधवार, 5 एप्रिल 2017 (20:40 IST)
सीरियाच्या इदलिब प्रांतात मंगळवारी रासायनिक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १०० जण मृत्यूमूखी पडले असून ४०० हुन अधिकजण जखमी झाले आहेत. इदलिब प्रांतातातील खान शयखुन भागात हा हल्ला झाला असल्याचे समजते. क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्ब टाकण्यात आल्याचा दावा एका फेसबुक पोस्टवरून करण्यात आला होता.  मी जेव्हा पाहिले, तेव्हा नागरिक जमिनीवर पडून होते. अनेक लहान मुलांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याची माहिती देण्यात आली आहे. हा हल्ला बंडखोरांनी केल्याचा आरोप सीरियाच्या लष्कराने केला आहे. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने या हल्ल्याला राष्ट्रपती बसर-अल- असद यांना जबाबदार धरले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिंगळे यांचा जामीन मंजूर