Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा वाटून घेतो सर्वांचे दु:ख

हा वाटून घेतो सर्वांचे दु:ख
सुखाचे साथीदार अनेक असतात, पण दु:खात मात्र कोणी साथ देत नाही, असे नेहमी म्हटले जाते. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव येत असतात. जपानमधील एक व्यक्ती मात्र याला अपवाद आहे. कारण, तो सर्वांचेच दु:ख वाटून घेत असतो. 
या व्यक्तीचे नाव आहे टाकानोबू नि‍शीमोटो. या 45 वयाच्या व्यक्तीने 20 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक नोकर्‍या केल्या. आता त्यांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे. ते आता दुसर्‍यांचे दु:ख वाटून घेतात, समजून घेतात आणि बदल्यात पैसे घेतात.
 
कदाचित आश्चर्य वाटेल पण टाकानोबू निशीमोटो यांच्यासाठी दु:ख ऐकून समजावून घेणे ही आता सवयीची बाब झाली आहे. निशीमोटो एक सामान्य व्यक्ती आहेत. पण ते दुसर्‍यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. लोक आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी निशीमोटो यांना बोलावून घेतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंहगड किल्ला आठ दिवस पर्यटकांसाठी बंद