Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे तालिबानने तीन निमलष्करी जवानांची हत्या केली

terrorist
, सोमवार, 7 जुलै 2025 (12:21 IST)
पाकिस्तानात तालिबानने कहर केला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे तालिबानने पाकिस्तानच्या तीन निमलष्करी जवानांची हत्या केली आहे. जगभरात दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तान आता स्वतःच शिक्षा भोगत आहे. तसेच पाकिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ले सातत्याने होत आहे आणि सैनिक आणि सामान्य लोक ठार मरत आहे. अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात बसलेले दहशतवादी सतत पाकिस्तानी लष्कराच्या जवानांची हत्या करत आहे. आता वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानी तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या तीन निमलष्करी जवानांची हत्या केली आहे.  
ALSO READ: ठाकरे बंधूंच्या गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट
माहितीनुसार, पाकिस्तानी तालिबानशी संबंधित दहशतवाद्यांनी दोन दिवसांसाठी तीन निमलष्करी जवानांना ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर, दहशतवाद्यांनी सैनिकांची हत्या केली. ही माहिती रविवारी स्थानिक पोलिसांनी जाहीर केली. पोलिसांनी सांगितले की डोंगराळ भागात तीन निमलष्करी जवानांचे मृतदेह सापडले आहे.
ALSO READ: PM मोदी BRICS शिखर परिषदेत सामील
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे बंधूंच्या गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट