Publish Date: Mon, 31 Oct 2016 (11:32 IST)
Updated Date: Mon, 31 Oct 2016 (11:37 IST)
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे खासगी शाळेत दोन बंदुकधारी घुसले आहेत. शाळेत घुसताच त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळाली आहे. बहावलनगरमधील हरुनाबाद परिसरात ही शाळा आहे. गोळीबार होत असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून शाळेला घेरलं आहे.
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 61 पोलिसांचा मृत्यू झाला होता तर 165 जण जखमी झाले होते. क्वेटा येथे सारयाब रोडवर असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर तीन दहशतवादी रात्री गोळीबार करत सेंटरमध्ये घुसले. यावेळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला.