Publish Date: Wed, 30 Jul 2025 (18:44 IST)
Updated Date: Wed, 30 Jul 2025 (18:46 IST)
थायलंडमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली आहे. येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्य थायलंडमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
बँकॉकपासून सुमारे ९५ किमी वायव्येस असलेल्या सुफान बुरी प्रांतात हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही.
Edited By- Dhanashri Naik