Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

G7 वर्चूव्हल बैठक आज,अफगाणिस्तान वर चर्चा होऊ शकते

G7 वर्चूव्हल बैठक आज,अफगाणिस्तान वर चर्चा होऊ शकते
, मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (14:38 IST)
वॉशिंग्टन.जगातील सात शक्तिशाली देश शुक्रवारी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबीज केल्यानंतरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वर्चूव्हल बैठक घेऊ शकतात.
 
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांच्या म्हणण्यानुसार,अध्यक्ष जो बायडेन 24 ऑगस्ट रोजी जी 7 देशांच्या नेत्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेऊ शकतात.हे नेते अफगाणिस्तानच्या बाबतीत समन्वय वाढवण्यासाठी आणि पाश्चिमात्य देशांना पाठिंबा देणाऱ्या अफगाणींना बाहेर काढण्यावर चर्चा करतील.
 
ब्रिटन या वर्षी G7 देशांचे अध्यक्ष आहे. या गटात अमेरिका तसेच कॅनडा, फ्रान्स,जर्मनी, इटली आणि जपान यांचा समावेश आहे.
 
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केले: "आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करण्यासाठी, मानवी बचाव, मानवतावादी संकट टाळण्यासाठी आणि गेल्या 20 वर्षांच्या कठोर परिश्रमांना सुरक्षित करण्यासाठी एकत्ररित्या  काम करण्याची गरज आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणाले होते राणे?