Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विमानात 2 तास अडकून होता 73 प्रवाशांचा श्वास,असा वाचला जीव

विमानात 2 तास अडकून होता 73 प्रवाशांचा श्वास,असा वाचला जीव
, मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (10:27 IST)
काठमांडू,नेपाळ येथून येत असलेले बुद्ध एअरचे विमान बिहारच्या विराट नगरमध्ये उतरणार होते, तेव्हाच त्याचे लँडिंग गिअर खराब झाले. विमानात 73 प्रवासी होते.विमान 2 तास आकाशात उडत राहिले.या दरम्यान प्रवाशांचा श्वास अडकून होता.
 
एटीसीने विमानाचे लँडिंग गिअर बिघडल्याची माहिती देतातच. विराट नगर ते काठमांडू पर्यंत खळबळ उडाली. येथे, जेव्हा विमानातील प्रवाशांनाही हे कळले, तेव्हा त्यांचा थरकाप उडाला.
वैमानिकाने काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर विमान उतरवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. इंधनही हळूहळू संपत होते. वैमानिकाने शेवटच्या वेळी लँडिंगचा प्रयत्न केला. नशिबाने अचानक लँडिंग गिअर उघडले आणि विमान यशस्वीपणे उतरले.तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.अशा प्रकारे प्रवाशांचे प्राण वाचले.

सुरक्षित अवतरण pic.twitter.com/iqia8kjGab

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यवतमाळ मध्ये पुराच्या पाण्यात एसटीची बस वाहून गेली