Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

संचार उपग्रह जीसॅट १७ चे यशस्वी प्रक्षेपण

successful launch of isros gsat 17 satellite

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गुरुवारी अंतराळ मोहीमेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७ चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘एरियन- ५’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हे अंतराळात झेपावले. जीसॅट १७ या उपग्रहाचे बुधवारी दुपारी प्रक्षेपण होणार होते. मात्र खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी गुरुवारी हवामान प्रक्षेपणासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाल्यावर जीसॅट-१७ उपग्रह अंतराळात झेपावले. जीसॅट १७ हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. याशिवाय हवामानाविषयीची माहिती आणि शोधमोहीम आणि मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. यासाठी उपग्रहामध्ये उपकरणेही लावण्यात आली आहे.  फ्रेंच प्रक्षेपक एरियन-५ वीए २३८ च्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच 200 रुपयांची नोट व्यवहारात येणार