अमेरिकेत पुन्हा एकदा सार्वजनिक गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील ओकलँड पोलिसांनी सांगितले की, जूनटीनथ सेलिब्रेशनदरम्यान 15 जणांना गोळ्या घालण्यात आल्या. वृत्तसंस्था पीटीआयने एपीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियाच्या ओकलंडमध्ये गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबाराची ही घटना घडली आहे. याआधी गेल्या शनिवारी रात्री टेक्सासच्या राऊंड रॉकमध्ये जुनीटींथ सेलिब्रेशनदरम्यान गोळीबार झाल्याची बातमी आली होती. हल्लेखोराने जमावावर गोळीबार केला, परिणामी तीन जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारात दोन मुलांसह सहा जण जखमी झाले आहेत.
टेक्सासमधील गोळीबाराची घटना जूनीटींथच्या उत्सवादरम्यान विक्रेत्याच्या क्षेत्राजवळ दोन गटांमध्ये भांडण झाल्यामुळे घडली. या चकमकीत कोणीतरी बंदूक काढून गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.