आपण नेहमी माणसांचा दात तुटल्यावर त्याऐवजी सोनं, चांदी किंवा इतर धातूचा दात बसवलेला बघितला असेल परंतू जर्मनीच्या मासवीलर शहरात एका वाघिणीचा पुढला बाजूला असलेला दात खेळणी चावल्याने तुटल्यामुळे आता त्याऐवजी सोन्याचा दात लावण्यात आला आहे. आता ती आपला नवीन सोन्याचा दात दाखवत हसताना दिसते.
सूत्रांप्रमाणे, वाघाचे टोकदार दात शिकारासाठी आणि कोणत्याही वस्तू फाडण्यात सक्षम असतात. इटलीच्या तस्करांकडून 5 वर्षांपूर्वी मुक्त करण्यात आलेली बंगाल टायगर कारा हिला या महिन्यात 2 सर्जरी करुन सोन्याचा दात बसवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये खेळणी चावल्यामुळे तिचा पुढील दात तुटून गेला होता.
सर्जरीच्या 3 आठवड्यानंतर ती सामान्य झाली. पहिल्या सर्जरीत 2 तासाहून अधिक वेळ लागला तर दुसर्या सर्जरीत सुमारे दीड तास लागला. 3 आठवडे तिला हाडं नसलेलं मांस खायला देण्यात येत होतं.
दात लावल्यानंतर कारा खूप वेळेपर्यंत दात चाटत होती कारण धातूच्या नवीन दातामुळे तिला अस्वस्थ वाटत होतं. आता ती नवीन सोन्याच्या दात दाखवत हसताना दिसून येते.