Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजकुमारीचे एका सेवकच्या मुलाशी लग्न

राजकुमारीचे एका सेवकच्या मुलाशी लग्न
मलेशियात सोन्याच्या जहाजामध्ये उडणार्‍या सुलतानाच्या मुलीने फुलांच्या दुकानातील एका नोकराच्या मुलाशी विवाह केले. ही एक सत्य घटना आहे ज्यात राजकुमारीने एका सामान्य माणसाशी लग्न केले. उल्लेखनीय आहे की मलेशियाच्या जोहोर स्‍टेटची राजकुमारी तुंकू तुन अमीनाह मैमुनाह इस्कंदरिया डच मूळच्या डेनिस मुहम्‍मद अब्‍दुल्‍लाह यासोबत विवाह बंधनात अडकली. विशेष म्हणजे सुलतानाचा हा जावई एका प्रॉपर्टी डेव्हलपमेंट फर्ममध्ये काम करतो.
 
राजकुमारी आणि डेनिस यांची भेट मलेशिया येथील एका कॅफेमध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी झाली होती. नंतर डेनिस याने इस्‍लाम स्वीकारले. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबांचा होकार आणि आशीर्वाद होता.
 
हे विवाह अगदी परंपरागत रीती-भातीप्रमाणे करण्यात आले आणि जोहोर च्या मुस्लिम यांच्या परंपरेनुसार सुलतान यांनी आपल्या मुलीला 22.50 रिंगिट म्हणजे सुमारे 300 रुपये ची मेहर रक्कमाची मागणी केली.
 
डेनिसचे वडील एका फुलाच्या दुकानात तर आई कापड्याच्या दुकानात काम करते, जेव्हाकी जोहोर चे सुलतान सर्वात सामर्थ्यवान सुलतानांमधून एक असून तेथील आर्मीचे कर्नल इन चीफ आहे. त्यांची स्वत:ची आर्मी असून त्यांच्याकडे 641 कोटी रूपयांचा एक गोल्ड प्लेटेड प्लॅन आणि एक आलिशान तीन मजली मेंशनदेखील आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SET च्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुरूस्त करून ४५ दिवसात निकाल जाहीर होईल