ऑस्ट्रेलियात दोन हेलिकॉप्टरची धडक होऊन चार जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली. क्वीन्सलँडचे पोलिस निरीक्षक गॅरी वॉरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कोस्टवरील मेनबीचवरून जात असताना दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली
अधिकाऱ्यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. मात्र, बचाव पथक आणि डॉक्टर कसेतरी तिथे पोहोचले. देशाच्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोल्ड कोस्टमध्ये सुट्टीच्या दिवसात मोठी गर्दी असते.
क्वीन्सलँड अॅम्ब्युलन्स सर्व्हिस (QAS) च्या जेनी शेरमनच्या मते, दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये 13 लोक होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला, तीन गंभीर जखमी झाले आणि सहा जणांना किरकोळ दुखापत झाली, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही.अपघातानंतर जवळपासचे पोलीस आणि लोक हेलिकॉप्टरमधील लोकांना बाहेर काढण्याचा आणि प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न करत होते.