Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत : अमेरिका

लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत : अमेरिका
, बुधवार, 17 जून 2020 (16:27 IST)
लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडपझाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे.  दरम्यान, लडाख हिंसक झडपेनंतर भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दोन्ही देशांकडे लागले आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने झालेल्या भारतीय जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, संयुक्त राष्ट्र संघानेही चिंता व्यक्त केली आहे.
 
अमेरिकेनंतर संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यानच्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच, सोमवारी रात्री गलवाने खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. त्यानंतर संघर्ष अधिकच चिघळला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमपीएससीचे सुधारित वेळापत्रक जाहीर