Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#webviral ओबामाने प्ले फोनसाठी सोडले ब्लॅकबेरीचा साथ

#webviral ओबामाने प्ले फोनसाठी सोडले ब्लॅकबेरीचा साथ
, मंगळवार, 14 जून 2016 (16:49 IST)
ते कॉल नाही करू शकत. मेसेज नाही करू शकत, गाणे नाही ऐकू शकत आणि फोटोही काढू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची सुरक्षा.  
 
स्मार्टफोनच्या बाबतीत जग फारच तीव्रगतीने बदलत आहे. यूएसएचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामापण आता मागे नाही आहे. त्यांनी आपल्या बर्‍याच वेळेपासून सोबत असलेला ब्लॅकबेरी मोबाइलला सोडले आहे. हा मोबाइल त्यांच्याजवळ राष्ट्रपती बनण्या अगोदरापासून होता.  
 
ओबामाने स्वत: म्हटले की त्यांना नवीन मोबाइल मिळाला आहे. जो सुरक्षा कारणांमुळे लॉक आहे आणि ते कॉल, मेसेज, फोटो घेणे आणि गाणे ऐकण्याचे काम यावर करू शकत नाही. त्यांना अस वाटत आहे की तीन वर्षाच्या मुलाला देण्यात आलेल्या प्ले फोन सारखा आहे त्यांचा फोन ज्यावर काहीही काम होत नाही.  
 
जेव्हा ओबामा प्रेसिडेंट बनले होते त्या वेळेस ब्लॅकबेरी हायक्लास टेक्नॉलाजी होती. 2010पासूनच ओबामा ब्लॅकबेरीपासून कंटाळले होते पण सुरक्षा कारणांमुळे ते आयफोन वापरू शकत नव्हते.   
 
मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ब्लॅकबरीने फक्त 10 नंबरांचे कॉल होऊ शकत होते ज्यात उपराष्ट्रपती जो बिडेन, प्रेसिडेंटचा चीफ स्टॉफ, त्यांचा प्रेस सेक्रेटरी, त्यांची बायको आणि काही पारिवारिक लोक.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ही कोंबडी दोन वर्षापासून करत आहे दुनियेची सैर