Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#webviral पुतळ्यासोबत अश्लील चाळे

#webviral पुतळ्यासोबत अश्लील चाळे
तिचीच चूक आहे... तिच कारणीभूत असावी... काय ते कपडे काय तिचे रंगढंग... ती तिथे गेलीच कशाला? या प्रकाराचे वाक्य ऐकायला येतात जेव्हा एखाद्या बलात्कार किंवा छेड काढल्याची बातमी समोर येते. अशा लोकांचे तोंडं बंद करण्यासाठी हा फोटो व्हायरल होत आहे.
 
अश्लील चाळे किंवा बलात्कारासाठी मुलींच्या परिधानावर कमेंट करणारे जरा लक्ष देऊन पहा आणि सांगा काय याच्यात मुलीने मुलांना हे कृत्य करायला भाग पाडले? या फोटोत बुरखा घातलेल्या मुलीबरोबर एक व्यक्ती अश्लील चाळे करत आहे.
स्त्रियांबरोबर होणार्‍या गैरवर्तनासाठी त्यांचे परिधान नव्हे तर पुरुषांची विकृत मानसिकता जबाबदार आहे, हे सिद्ध करण्यासाठीच हा फोटो व्हायरल होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#webviral हे #‎sixwordstory काय आहे?