मासे जगभरातील लोक खातात पण मासे खाल्ल्याने मृत्यू होण्याच्या धक्कादायक प्रकार मलेशियामध्ये घडली आहे. एका 83 वर्षाच्या महिलेचा मासे खाल्याने मृत्यू झाला. तर महिलेचा पती कोमात गेला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी पफरफिश खालले होते.
हे मासे विषारी असल्याचे सांगितले जात आहे. या जोडप्याची मुलगी म्हणाली, 'तिच्या वडिलांनी 25 मार्च रोजी जवळच्या दुकानातून पफर फिश विकत घेतले होते. यानंतर दोघांनी जेवणात मासे खाल्ले, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या आईचा थरकाप सुरू झाला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अस्ताला आईचा मृत्यू झाला. आईच्या आजारी झाल्या नंतर वडिलांना देखील तसाच त्रास होऊ लागला .वडील कोमात गेल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले. आईच्या मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. पफरफिश मध्ये घातक विष आढळते. जे थंड करून किंवा गरम करूनही नष्ट होऊ शकत नाही.