Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Record :मुलीच्या मृत्यूनंतर आईने नखे नाही कापले, 42 फूट लांब झाले, विश्वविक्रम केला

World Record :मुलीच्या मृत्यूनंतर आईने नखे नाही कापले, 42 फूट लांब झाले, विश्वविक्रम केला
, रविवार, 7 ऑगस्ट 2022 (17:22 IST)
image-social mediaलोकांमध्ये विविध प्रकारचे रेकॉर्ड बनवण्याची क्रेझ आहे. त्यांना जे काही करायचे आहे त्याला ते मनापासून करतात आणि मग रेकॉर्ड बनते. डायना आर्मस्ट्राँग नावाची 63 वर्षीय महिला. हिने  एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून तिने नखे कापली नाहीत.यानंतर आता तिच्या नखांची लांबी (एकत्रित लांबी) 42 फूट 10 इंच आहे. इतकी लांब नखं ठेवल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने डायना आर्मस्ट्राँगच्या नावाचा आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये समावेश केला आहे. पण एवढी लांब नखे असण्यामागे एक वेदनादायक कथा आहे.
 
न्यूयॉर्क पोस्टनुसार, डायनाचा दावा आहे की तिच्या नखांची एकूण लांबी डबल-डेकर बसपेक्षा जास्त आहे. डायनाने 1997 मध्ये शेवटची नखे कापली. खरं तर, तिच्या 16 वर्षांच्या मुलीचा झोपेत दम्याचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतरच तिने नखे कापली नाहीत. कारण तिची  मुलगी तिचे नखे साफ करायची. शेवटच्या वेळी तिच्या मुलीने नखांवर नेलपॉलिश लावली होती. त्यानंतर तिला नखे ​​कापण्याचे धाडसही करता आले नाही.
 
ती म्हणते, 'जेव्हा मी माझी नखे वाढवण्याचा विचार केला, तेव्हा मला माहित नव्हते की मी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणार आहे. आता मी लोकांना सांगते की कधीही कोणालाही जज करू नका, कारण ते कोणत्या टप्प्यातून गेले आहेत हे तुम्हाला माहीत नाही.
 
तिची नखे इतकी लांब आहेत की तिच्या नखांसाठी  15 ते 20 नेलपॉलिशच्या बाटल्या लागतात. तिला आता गाडीही चालवता येत नाही. तिची नात आता तिच्या नखांची काळजी घेते. ती फक्त त्यावर नेलपॉलिश लावते. ती सांगते की आजही तिला प्रत्येक वेळी तिच्या मुलीची नखं पाहिल्यावर तिची आठवण येते. आज नखे पॉलिश करण्यासाठी तिला पाच तास लागतात. डायनाने मागील रेकॉर्ड धारकाला मागे टाकले आहे, ज्याच्या नखांची लांबी 18 फूट 9.7 इंच होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ration Card: रेशन कार्डसाठी सरकार ने नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली