Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sara Lee Death: WWE स्टार सारा लीचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन

Sara Lee Death:  WWE स्टार सारा लीचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन
, शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (16:01 IST)
Sara Lee Death:क्रीडा जगतासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) कुस्तीपटू सारा ली यांचे निधन झाले आहे साराच्या मृत्यूची बातमी तिच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यानंतर त्याचे चाहते खूपच अस्वस्थ झाले आहेत. वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

साराच्या आईने केवळ तिच्या पोस्टमध्ये मृत्यूची माहिती दिली. WWE स्टारचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजलेले नाही. सारा लीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर WWE व्यतिरिक्त, अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला.
 
सारा लीने जवळपास एक वर्ष WWE मध्ये फाईट केली आहे सारा ली WWE च्या रिअॅलिटी सीरिज टफ इनफच्या सीझन 6 ची विजेती देखील आहे. 2016 च्या शेवटी, साराने तिचा शेवटचा सामना खेळला. ती रिअॅलिटी मालिका टफ इनफ सीझन 6 ची विजेती देखील आहे. सारा लीने पाच वर्षांपूर्वी माजी WWE सुपरस्टार वेस्ली ब्लेकसोबत 30 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले.

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजून परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झालेला नाही