Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानी मुलगा बनला भारताचा सर्वात लहान बोन मॅरो डोनर

पाकिस्तानी मुलगा बनला भारताचा सर्वात लहान बोन मॅरो डोनर
पाकिस्तानचा 8 महिन्याचा मुलगा रयान आपल्या 2 वर्ष 4 महिने मोठी ब‍हीण जीनियाला बोन मॅरो दान करणारा सर्वात लहान वयाचा डोनर बनला आहे. जीनियाला एक दुर्लभ आजार हीमोफैगोसिटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस आहे. या आजारात तिचे बोन मॅरो काही असामान्य पेशींचे निर्माण करत होते ज्यामुळे सामान्य पेशींना धोका पोहचत होता. याच्या उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्ससप्लांट गरजेचं होतं.
 
जीनियाचे वडील जिया उल्लाहने सांगितले की पाकिस्तानात असे मानले जातात की या आजारावर उपचार शक्य नाही. आम्ही तर उमेद सोडली होती परंतू नंतर आम्हाला कळले की यावर उपचार संभव आहे.
जीनियावर उपचार करणारे डॉक्टर सुनील भाट यांनी सांगितले की बोन मॅरो ट्रान्ससप्लांटच्या दोन महिन्यानंतर आता दोन्ही मुलं स्वस्थ आहे आणि काही दिवसातच आपल्या पाकिस्तानच्या साहीवाल येथे असलेल्या आपल्या घरी परतू शकतात.
 
जीनियाला गंभीर परिस्थितीत भारतात आणले गेले होते. डॉक्टरांप्रमाणे केवळ तिच्या लहान भावाचे बोन मॅरो मॅच करत होते. हे धोकादायक आणि संवेदनशील ऑपरेशन होतं कारण यात रयानच्या जीवाला धोका होता. डॉक्टरप्रमाणे या ट्रान्ससप्लांटनंतर रयान भारताचा सर्वात कमी वयाचा बोन मॅरो डोनर बनला आहे.
 
तसेच वडील जिया उल्लाह म्हणाले की आता ते लोकांना याबद्दल जागरूक करण्यासाठी फेसबुक पेज तयार करतील. आणि पाकिस्तानात ही या आजाराबद्दल जागरूकता पसरवतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रतन टाटा ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्षपद सोडणार नाहीत: टाटा सन्स