Article International Marathi News %e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%a1 %e0%a4%ac%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be %e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%8a%e0%a4%a8 108021800003_1.htm

Marathi Biodata Maker

अपमानाची परतफेड बकरा घेऊन!

अपमानाची परतफेड बकरा घेऊन
नैरोबी
राष्ट्राध्यक्ष मवई किबाकी यांनी आपला अपमान केला असून त्याबदल्यात त्यांनी आपल्याला एक बकरा द्यावा अशी अजब मागणी केनियातील एका खासदाराने केली आहे.

गिताबू इमान्यारे असे या खासदाराचे नाव असून, आपल्याला गेल्या महिन्यास स्टेट हाऊसमध्ये श्रीमती लकी किबाकी यांनी अपमानित केल्याचा त्याचा आरोप आहे. तेथील स्थानिक जातपंचायतीच्या बैठकीत गिताबू यांनी नुकसानभरपाई म्हणून बकर्‍याची मागणी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi