वॉशिंग्टन- भारत आणि अमेरिकेला एकमेकांचे लष्करी तळ वापरण्याची संमती देणार्या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री अँश कार्टर यांच्या उपस्थितीत झालेल्या या लष्करी सहकार्य करारानुसार (लॉजिस्टिक एक्स्चेंज मेमोरेन्डम ऑफ अँग्रिमेंट- लिमोआ) दोन्ही देश एकमेकांना ‘थेट कारवाईदरम्यान’ सहकार्य करू शकणार आहेत.
या करारानुसार, दोन्ही देशाचे लष्कर इंधन भरण्यासाठी, पुरवठय़ासाठी अथवा दुरुस्तीसाठी एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार आहेत.