Article International Marathi News %e0%a4%85%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2 109070800004_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अलविदा' मायकल

अलविदा मायकल
किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनला अखेर जगाने 'अलविदा' केले. लॉसेंजेलिस येथील स्टेपल सेंटरमध्ये झालेल्या एका भव्य समारोहानंतर मायकलचे शरीर दफन करण्यात आले.

या प्रसंगी त्याच्या कुटुंबीयांसह त्याचे लाखो चाहते उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी तर त्याच्या या दफन सोहळ्यात आपला कार्यक्रम सादर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

जॅक्सनचे आई-वडील आणि त्याच्या आठ भावांसह तीन मुलं या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्या पुढ्यातच मायकलचा मृतदेह सोनेरी कॅफेनमध्ये ठेवण्यात आला होता.

नेल्सन मंडेला आणि डायना रोस यांच्या श्रद्धांजलीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 'जॅक्सन माझ्यासाठी सर्व काही होता, आता मी त्याच्या मुलांसाठी सर्व काही आहे, मी त्याच्या मुलांना आई प्रमाणे प्रेम देईल असा संदेश आपल्या श्रद्धांजलीतून जॅक्सनची मैत्रीण नामित डायना रोसने दिला.

यानंतर जॅक्सनच्या पाच भावांनी जॅक्सनची शवपेटी सर्वांच्या मध्यात ठेवली आणि 20 हजारांवर त्याच्या चाहत्यांना आपले अश्रू रोखता आले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi