पुणे येथे महिला आणि तिच्या मुलीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुणे येथील सोसायटीतील दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे 20 वर्षीय तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे ज्या पुरुषाने हे केलय तो रिकामटेकडा असून त्यांची पत्नी आय ए एस ऑफिसर आहे. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तरुणी सेजल श्रॉफ आणि आरोपी मिलिंद काळे कोथरुडच्या उच्चभ्रू महात्मा सोसायटीत राहतात. सेजल श्रॉफ आणि तिच्या आईने रस्त्यावरील कुत्र्यांच्या 3 पिल्लांना घरात आश्रय दिला होता. मात्र शेजारी राहणाऱ्या मिलिंद काळेंना या कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होत होता.
त्यामुळे कुत्र्यांची पिल्ले घेऊन जाण्यासाठी मिलिंद काळेंनी महापालिकेची श्वानपथकाची गाडी बोलावली मात्र पण ही पिल्ले दोन महिन्यांची असल्याने कायदेशीररीत्या त्यांना घेऊन जाता येणार नाही असे म्हणत सेजल आणि तिच्या आईने विरोध केला.
त्यामुळे चिडलेल्या मिलिंद काळेंनी सेजल आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत सेजलचा दात पडला. यानंतर सेजलने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद काळेंविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काळेला अटक केली आहे.