इजिप्तमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यात आज महत्वाची भेट होणार आहे. मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे.
पाकिस्तानने या भेटीसाठी पार्श्वभूमी तयार करताना मुंबई बॉम्ब स्फोटाच्या तपासाचे ताजे दस्तावेज भारताला सोपविले आहेत. मनमोहन मंगळवारी इजिप्तमध्ये तेथील वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता गिलानी यांना शर्म अल शेखच्या हॉटेल मेरीटिम जोली विल्ले गोल्फ रिसार्टमध्ये भेट घेणार आहे.