Publish Date: Tue, 22 Jan 2008 (13:48 IST)
Updated Date: Tue, 22 Jan 2008 (13:48 IST)
अलकायदाला अतिरेकी कारवायांमध्ये संघणकांच्या माध्यमातून मदत कारणार्या एका सायबर अतिरेक्याला येथील स्क्वॉटलंड पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी जेरबंद केले होते.त्याच्या गुप्त कारवायांबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली असून, अतिरेक्यांना मदत करणारा हा मास्टर माइंड तालिबानी अतिरेक्यांचा सर्वात आवडता आतंकवादी होता.
एवढेच नाही तर,अमेरिकेविरोधात आंतरराष्ट्रीय प्रचाराची जबाबदारीही युनूस त्सोली या अतिरेक्याला देण्यात आली होती. तालीबानने याला आपले संकेतस्थळ तयार करण्याचे कामही दिले होते, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
त्सोलीकडे युवकांना अमेरिकेविरोधात एकत्र करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याने आपल्या संघणकाला 'इरहाबी 007' हा कळीचा शब्द दिला होता. हा मूळ अरबी शब्द असून, याचा अर्थ 'अतिरेकी 007' असा होतो. त्याच्या शयनकक्षातून पोलिसांना एक डायरी मिळाली असून, यात पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.