Article International Marathi News %e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%9d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa 107121700006_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंझमामचा लॉसनवर आरोप

प्रशिक्षकाच्या अनुनभवीपणामुळे पाकचा पराभव

कराची
भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय व कसोटी मालिकेतील पाकच्या पराभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुनभवी असलेले प्रशिक्षक ज्योफ लॉसन हे जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने केला.

त्याने सांगितले की, शोएब मलिक युवा कर्णधार असून तो सध्या शिकत आहे त्याला मजबूत सहकार्याची गरज आहे. दुर्दैवाने प्रशिक्षक लॉसन आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन असून ते स्वत:च शिकत आहेत. मलिकला एखाद्या अनुभवी प्रशिक्षकाच्या सहकार्याची गरज आहे.

इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळून मायदेशी परतल्यानंतर इंझमाम सांगत होता की, श्रीलंका व बांगलादेशाचे माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर पाकसाठी योग्य प्रशिक्षक आहे. अनुभवी व्हॉटमोरला दूर करून लॉसनची निवड मंडळाने कशी केली हे समजण्यापलिकडे असल्याचेही त्याना सांगितले. तसेच मलिककडून आताचा अनेक अपेक्षा ठेवणे योग्य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi