इंडोनेशियात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला असून त्यात 12 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
खराब हवामानामुळे जकार्ता विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले असून विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात पुराचे पाणी शिरल्यामुळे हजारो वाहने पाण्यात अडकून पडले आहेत.
पुराच्या पाण्यात राष्ट्राध्यक्ष सुशीलो बाम्बंग युधोयोना यांचीही गाडी अडकल्यामुळे त्यांना सरकारी गाडी सोडून दुसर्या गाडीने घरी जावे लागले. जवळजवळ 40 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत.