Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक अनोखा विश्वविक्रम: 14 पुरुषांपासून 14 मुलं

एक अनोखा विश्वविक्रम: 14  पुरुषांपासून 14 मुलं
एका 36 वर्षी महिलेने अमेरिकेच्या डेट्रॉटमध्ये आपल्या 14 व्या अपत्याला जन्म देऊन एक वेगळाच विश्वविक्रम बनविला आहे. 14 वेगवेगळ्या पुरुषांसोबत या अनोख्या रेकॉर्डसाठी महिलेने संबंध ठेवले होते. तमुळे या रेकॉर्डला विशेष महत्त्व आले आहे.
 
रेकॉर्ड बनविणार्‍या महिलेचे नाव अनिता सुलिवान असे असून 2017 च्या गिनीज बुकच एडिशनमध्ये हे रेकॉर्ड नोंदविणत येणार आहे. तिची आई तिला आळशी म्हणून हिणवत होती. त्यामुळे काही वेगळे करायचे ठरवून मी हे पाऊल उचलले. या रेकॉर्डमुळे मला स्वत:ला अभिमान वाटत असल्याचे अनिताने स्पष्ट केले. 
 
14 व्या अपत्याच्या जन्मानंतर तिची बाकीची 13 मुलेही हार्पर युनिव्हर्सिटीच रुग्णालात भेटायला आली होती. ती सर्वजण या विक्रमामुळे आनंदित आहेत. अनिता म्हणाली, मुलांच्या वडिलांना निवडण्यात खूप चूक केली आहे. सगळ्यांनी मला त्रास दिला आहे. मात्र, माझा नवीन पार्टनर रेमॉन मेरे हा चांगला असून, आम्ही अडीच वर्षापासून एकत्रित राहत आहोत. अनिताला सोडलेल 13 पार्टनरपैकी 11 जणांकडून पेंशन मिळत आहे. बाकी दोघांच पेंशनसाठी न्यायालयात केस चालू असल्याचे समोर आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता