अमेरिकी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. बराक ओबामा आणि हिलेरी यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
एकमेकावर तोंडसुख घेऊन झाल्यावर आता बराक ओबामांनी चक्क आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी हिलेरी क्लिंटन यांना एक ऑफर दिली आहे.
जर हिलेरींना पछाडून आपण राष्ट्रपती झालो, तर त्यांना उपराष्ट्रपतीपद देण्यास आपण तयार असल्याचे ओबामांनी स्पष्ट केले आहे.
ओबामांनी एनबीसी न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत हिलेरींवर स्तुती सुमनांची उधळणं केली. हिलेरींच्या कार्यशैली बाबत आपल्याला कोणताही संशय नसून, त्या राष्ट्रपतिपदाऐवजी उपराष्ट्रपती म्हणून अधिक चांगली जबाबदारी पार पाडू शकतात असा टोमणाही त्यांनी लावला.
नॉर्थ कॅरोलिनातील विजयाने ओबामांचे पारडे जड झाले असून, त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी मिळण्याचे निश्चित मानले जात आहे.