Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कायपरच्या पट्टय़ात एका नवीनग्रहाचा शोध

कायपरच्या पट्टय़ात एका नवीनग्रहाचा शोध
, शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (10:24 IST)
सूर्यमालेतील नेपच्यूनच्या कक्षेपासून  पट्टय़ात खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे,  त्यामुळे आपल्या सूर्यमालेत प्लूटोसारख्या आणखी एका  ग्रहाची भर पडली आहे. सूर्यापासून ८.५ अब्ज मैल अंतरावर कायपरच्या पट्टय़ात हा नवीन ग्रह सापडल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 
 
आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेकडून ग्रहाबद्दल माहिती देण्यात आली आहे. प्लूटोप्रमाणे निम्म्या आकाराचा असलेल्या या नवीन बटू ग्रहाला 2014 यूझेड224 असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील खगोल वैज्ञानिक डेव्हिड ग्रेडेस यांच्या नेतृत्वाखालील पदवीचे शिक्षण घेणार्याय संशोधकांनी या नवीन ग्रहाचा वेध घेतला आहे. त्यानुसार आता आपल्या सूर्यमालेत सेरेस, हाऊमिया, मेकमेक, एरिस आणि प्लूटोसारख्या आणखी एका ग्रहाची भर पडली आहे. या पट्टय़ामध्ये अजूनही शंभरच्या जवळपास ग्रह असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
 
या ग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपल्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी जवळपास 1100 वर्षांचा कालावधी लागतो. अथांग ब्रह्मंडाचा अचूक नकाशा बनविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डार्क एनर्जी कॅमेर्या च्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या डेव्हिड यांनी याच कॅमेर्याजच्या मदतीने हा बटू ग्रह शोधून काढण्यात आल्याचे सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साईबाबांच्या दर्शनासाठी व्हिआयपी पास