Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीर आंदोलकांना पाठिंबा देण्याची नवाज शरीफांची शपथ

काश्मीर आंदोलकांना पाठिंबा देण्याची नवाज शरीफांची शपथ
इस्लामाबाद- बुरहान वानी या दशतवाद्याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये गेल्या महिन्याभरापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराला पाकिस्तान खतपाणी घालत आहे हे सर्वश्रुत आहे. या आधी बुरहानला ठार केल्यानंतर पाकिस्तानने 19 जुलै हा काळा दिवस म्हणून पाळला होता. यासंबंधीची घोषणा खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली होती. आता तर यापेक्षाही वरचढ पाऊल उचलत शरीफ यांनी काश्मिरींना सर्वोतोपरी मदत करण्याची शपथ घेतली आहे.
 
भारताकडे असणार्‍या काश्मीर खोर्‍यात हजारो निरपराध मारले जात आहेत. स्वातंर्त्य मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील लोक रस्त्यांवर उतरले आहेत. आपल्या हक्कांसाठी त्यांना जीव गमवावा लागतो आहे. त्यामुळे काश्मीरमधील जनतेला मदत करण्याची मी शपथ घेतो, असे ते म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींच्या भाषणातील बलुचिस्तानच्या उल्लेखाला काँग्रेसचा विरोध