Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीरमध्ये सैन्य घुसवा: हाफिज सईद

काश्मीरमध्ये सैन्य घुसवा: हाफिज सईद
'भारताला धडा शिकवण्यासाठी सैन्य भारतात घुसवा', असं आवाहन जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तानला केलं आहे.
 
हाफिज सईदने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांना भारतासोबत युद्ध छेडण्याचे आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसेमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्या पार्श्वभुमीवर असे आवाहन करण्यात आल्याचे शरीफने सांगितले.
 
यापूर्वीही सईदने जुलैमध्ये भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारताने गिलानीच्या 4 मागण्या मान्य कराव्या अन्यथा भारतापुढे युद्ध हा शेवटचा पर्याय असेल, असेही त्याने म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नीट परीक्षेत गुजरातचा हेत शहा देशात अव्वल