Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दाऊदच्या भावाचे कराचीत निधन

दाऊदच्या भावाचे कराचीत निधन
मुंबई , शनिवार, 25 जून 2016 (11:48 IST)
पाकिस्तानातील कराचीस्थित कुख्यात दाऊद इब्राहिम याचा लहान भाऊ हुमायूम कासकर (४0) याचे आजारपणामुळे निधन झाल्याचे सांगण्यात आले. हुमायूम हा गेले अनेक महिने कर्करोगाने आजारी होता. त्याच्यावर कराची येथील रुग्णालयात उपचार चालू होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्राने सांगितले. हुमायूम याच्या नावावर कोणत्याही गुन्ह्यांची नोंद नसल्याचे शहर पोलीस दलातील सूत्राने सांगितले. काही वर्षांपूर्वी दाऊद याचा भाऊ नूरा याचेही आजारपणामुळे निधन झाले होते. त्यानंतर दाऊदचा लहान भाऊ हुमायूम याचे निधन झाल्यामुळे दाऊदला मोठा हादरा बसला आहे. दाऊद हा मधुमेहाच्या विकाराने आजारी असून त्यामुळे त्याचे फिरणेही बंद झाल्याचे सूत्राने सांगितले. भारताचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार म्हणून दाऊदला घोषित केल्यापासून दाऊदच्या सर्व हालचालींवर र्मयादा आल्या असून, त्यामुळे त्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दाऊदची मुंबईत राहणारी बहीण हसीना हिचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्यामुळे मुंबईतील त्याचा व्यवसाय काहीसा ठप्प झाल्याचे बोलले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उध्दवची असरानीशी तुलना भाजपला भारी पडेल : शिवसेना