नेपाळच्या डांग जिल्ह्यात काल एक बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 18 प्रवाशी जागीच ठार झाले, तर 34 जण गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डांगमधील कावासोती जवळील राप्ती नदीच्या पात्रात ही बस पडली. या बस मधील 30 प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही बस कपीलवस्तूकडून कृष्णानगरकडे जात होती.