Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना

पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना
दिल्ली , शनिवार, 4 जून 2016 (11:51 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना झाले आहेत. आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर ते रवाना झाले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये भारताच्या मदतीने बांधलेल्या 1457 कोटींच्या सलमा धरणाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. हेरातमध्ये पोहचल्यानंतर मोदी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदी कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचाही दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरुन परतताना ते जर्मनीलाही जाण्याची शक्यता आहे. एकूण सहा दिवसांच्या या दौऱ्यात प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदी चर्चा करणार आहेत. दरम्यान मोदींच्या या दौऱ्यामुळे काळा पैसा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला शेतकऱ्यांसाठी काम करु द्या : खडसे