Article International Marathi News %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0 109072500009_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकला घरचा आहेर

लक्ष वळविण्यासाठीच पाकचे आरोप
बलुचिस्तानातील वास्तविक समस्यांपासून जगाचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठीच पाकिस्तान सरकार भारतावर आरोप करीत असल्याचे प्रतिपादन बलूच मानवाधिकार परिषदेचे सरचिटणीस समद बलूच यांनी केले आहे. बलूच यांच्‍या या दाव्‍याने आंतरराष्‍ट्रीय समुदायासमोर पाकिस्‍तानचे पितळ उघडे पडले आहे.

बलुचिस्तानात अशांतता माजविण्यात भारताचा हात असल्याचा पाकिस्तान सरकारने केलेला आरोप म्हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा असून, ही पाकिस्तानी नेत्यांची जुनीच चाल असल्याचे ते म्हणाले.

'बलुचिस्तान पाकिस्तानात आहे, भारतात नाही. ते भारताच्या सीमेवर असणारे राज्यही नाही. त्यामुळे भारत बलुचिस्तानात अशांतता कसा माजवू शकतो?' असा प्रश्नही त्यांनी विचारला. इजिप्तमधील भारत व पाकिस्तानच्या पंतप्रद्यानांमध्‍ये झालेल्या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख करून आपण फार मोठी बाजी मारल्याचे पाकिस्तान सरकारला वाटत असले, तरी त्यांची ही चाल त्यांच्याच अंगलट आणल्याशिवाय बलूच राष्ट्रीयता चळवळीचे नेते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi