Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात हल्ले करण्याची 'इसिस'ची धमकी

भारतात हल्ले करण्याची 'इसिस'ची धमकी
दिल्ली , शनिवार, 21 मे 2016 (13:45 IST)
'इसिस' या दहशतवादी संघटनेचा 22 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओत भारतात हल्ले करण्याची धमकी दिलीये. बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ अशी धमकी आयसिसनं दिलीये. 
 
या व्हिडिओत पाच दहशतवाद्यांच्या मुलाखती आहेत. ठाण्यातून पळून गेलेल्या फाहद तन्वीर शेख याचाही समावेश आहे. आम्ही परत येऊ. मात्र, त्यावेळी आमच्या हातात तलवार असेल, आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ, असे फाहदने या व्हिडिओत म्हटलं आहे. गेल्यावर्षात बॉम्बहल्ल्यात मारला गेलेला त्याचा मित्र शहीम टंकी यालाही श्रद्धांजली वाहिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘व्हाईट हाऊस’मध्ये गोळीबार