Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताला विशेष दर्जा देण्यास नकार

भारताला विशेष दर्जा  देण्यास  नकार
वॉशिंग्टन , गुरूवार, 16 जून 2016 (15:39 IST)
अमेरिका आणि भारत ‘जागतिक संरक्षण आणि धोरणांमध्ये भागीदारी’ यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये ठराव पास न झाल्यामुळे भारताचा समावेश नाकारण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकन सिनेटला संबोधित केल्यानंतर जागतिक धोरणं आणि सुरक्षेच्या भागीदारीसाठी भारताचा अमेरिकन सिनेटमध्ये समावेश करण्यात यावा, अशी ओबामा यांना विनंती केली होती. दहशतवाद, सुरक्षा आणि धार्मिक देवाणघेवाण या मुद्यांवर भारत आणि अमेरिकेने मिळून धोरणं बनवण्याचा या प्रस्तावामध्ये समावेश होता. भारताला विशेष दर्जा देऊन अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय सैन्यासाठी प्रशिक्षण, पायरसी रोखणं, अशा मुद्यांसाठी अमेरिकेने सहकार्य करण्याची विनंती मोदी यांनी ओबामांना केली होती. सिनेटमध्ये प्रस्तावावर व्यवस्थित चर्चा न झाल्यामुळे हा प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. ओबामा यांच्या विरोधी रिपब्लीकन पक्षाचे सीनेटर जॉन मॅकिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण कायद्याअंतर्गत हा प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावर चर्चा न झाल्याने जॉन यांनी नाराजी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या कटात पोलिस अधिकारीही?