Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताविरोधात आण्विक युद्धाची धमकी

भारताविरोधात आण्विक युद्धाची धमकी
इस्लामाबाद : हिजबूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख सलाहुद्दीनने काश्मीर मुद्यावरुन भारताविरोधात आण्विक युद्धाची धमकी दिली आहे.
 
काश्मीरमधील जनतेने रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे सशस्त्र जिहाद हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे या निष्कर्षावर काश्मिरी जनता पोहोचली आहे', असं सलाहुद्दीन बोलला.
'काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी राजकीय, नैतिक आणि राज्यघटनेने समर्थन देण्यासाठी पाकिस्तान बांधील आहे.  आणि जर पाकिस्तानने समर्थन दिलं तर दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध होण्याची चांगली संधी आहे. काश्मीर मुद्द्यावरुन चौथे युद्ध होईल असा माझा अंदाज आहे. तसं झाल्यास काहीही झालं तरी तडजोड करणार नाही', असा दावा सलाहुद्दीनने केला आहे.
 
काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीचा खात्मा केल्यानंतर सुरु असलेला हिंसाचार सुरु राहावा यासाठी गेले काही दिवस पाकिस्तान आणि पाकिस्तानचं समर्थन मिळालेले दहशतवादी भडकाऊ वक्तव्य करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट