Publish Date: Fri, 29 Jun 2007 (12:47 IST)
Updated Date: Fri, 29 Jun 2007 (12:34 IST)
मंगळावर मोठे वादळ सध्या थैमान घालत असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे. स्पेस डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हे वादळ हजारो मैल पसरले असून त्याचा विस्तार वाढत असल्याची शंका आहे.
या वादळाने निम्म्याहून अधिक मंगळाला वेढले असल्याची शक्यता मार्क्स एक्सप्लोरेशन रोवर प्रोजेक्टचे शास्त्रज्ञ स्टिव्हन स्कायर यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या वादळाची नेमकी व्याप्ती अजूनही समजलेली नाही.
आतापर्यंत मंगळावर आलेल्या वादळांपैकी हे सर्वांत मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी 2001 मध्ये वादळ झाले होते. मात्र, त्याबाबत फार माहिती उपलब्ध नाही.